CoronaVirus धक्कादायक! धारावीच्या झोपडपट्टीमध्ये सापडलेल्या रुग्णाचा मृत्यू

 



CoronaVirus in Mumbai गेल्या आठवड्यात प्रभादेवीच्या महिला फेरीवालीला कोरोनाची लागण झाली होती. आज त्याहून धक्कादायक बातमी हाती येत आहे.


मुंबई : मुंबईतील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाने हजेरी लावल्याने आरोग्य यंत्रणांची भंबेरी उडालेली आहे. मुंबईत आता सामान्य स्तरावरही कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


गेल्या आठवड्यात प्रभादेवीच्या महिला फेरीवालीला कोरोनाची लागण झाली होती. आज त्याहून धक्कादायक बातमी हाती येत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीतील ५६ वर्षांच्या पुरुषाला प्रवासाचा कोणताही इतिहास नसताना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या कुटुंबातील ७-८  सदस्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईतच सापडत आहेत. जसलोक हॉस्पिटलमध्येही आठ नर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर सेव्हन हिल्सच्या एका प्रतिष्ठित डॉक्टरनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवासांपूर्वी सैफी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ह़ॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 


सध्या सेव्हन हिल्समध्ये १४५ जणांना संस्थात्मक अलगीकऱणासाठी दाखल कऱण्यात आले आहे. याखेरीज, आणखी धक्कादायक बाब म्हणजे, जसलोक रुग्णालयातील सात परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निर्वाळा रुग्णालय प्रशासनाने दिला आहे. परिणामी, जसलोक रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग त्वरित बंद कऱण्यात आला असून परिचारिकांखेरीज या अनय कोरोना रुग्णांवरही येथे उपचार सुरु आहेत.



मुंबई के धारावी के जिस व्यक्ति का कोरोना वायरस टेस्ट पॉजिटिव आया था, उसकी सायन अस्पताल में मौत हो गई है। उनमें बुखार, खांसी, सांस लेने में समस्या जैसे लक्षण और गुर्दे फेल होने जैसी स्थिति थी।



दरम्यान, प्रसुतीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर नाका येथील महिलेला २६ मार्चला एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.  त्या महिलेची प्रसूती सिझेरियनद्वारे झाली. महिला बेशुद्ध असतानाच त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्पेशल वॉर्ड खाली करण्यास सांगितला. हा वॉर्ड पालिकेने स्वच्छ करायला सांगितले असल्याचे कारण त्यांनी दिले. त्यामुळे  नकार दिला नाही, असे या महिलेच्या पतीने सांगितले. दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. म्हणून आपणही पत्नीसह मुलाची खासगी लॅबमध्ये १३ हजार रुपये खर्च करून कोरोनाची चाचणी केली. त्यात पत्नी आणि ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, असे या व्यक्तीने व्हिडिओत सांगितले