सिंधुदुर्गनगरी दि.७ एप्रिल
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिडं १९ या विषाणूमुळे ओढवलेल्या भयानक आपत्तित दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण हे वाढत चालले आहे.याचीच दखल घेत सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कॅथॉलिक क्रेडीट को. ऑप. क्रेडीट सोसायटी आपल्या सर्व संचालक मंडळ यांना विश्वासात घेत सर्वानुमते मदत म्हणून एक भरीव रक्कम देऊन आपल्या कॅथॉलिक बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकि जपली आहे.आज दिनांक ०७ एप्रिल २०२० रोजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी *५,००,०००/-( पाच लाख )* रूपयेचा धनादेश मा.जिल्हाधिकारी मा.के.मंजूलक्ष्मी सिधुदूर्ग यांच्याजवळ सुपुर्त केला आहे.ही मदत चेक स्वरूपात रक्कम असून ती सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक श्री.एम.बी.सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या ताब्यांत कॅथॉलिक बँकेचे चेअरमन मा.पी.एफ.डान्टस यांनी चेक दिला.यावेळी बँकेचे सेक्रेटरी मार्टिन आलमेडा ,संचालक रुजाय रॉड्रिंक्स जनरल मॅनेजर जेम्स बर्जीस हे कॅथॉलिक बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.